दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांसाठी मंडळाने दिल्या महत्वाच्या सूचना

0

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा (SSC & HSSC Examination) येत्या २१ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान होणार असून या परीक्षेपूर्वी मंडळाचे महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. परीक्षेस उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देश मंडळाने दिले आहेत. उशिरा येणाऱ्या काही विद्यार्थ्यांकडे प्रश्नपत्रिकेचा काही भाग सापडल्याचे प्रकार यापूर्वी घडले असून त्यावर आळा घालण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता मंडळाने याबाबत कठोर धोरण स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.

दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात ११ वाजता तर दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आहेत. सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य राहणार आहे. मंडळाने यासंदर्भात सूचना देणारे पत्र सर्व शाळांना पाठविले आहे. याशिवाय कॉपीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर फिरती व स्थायी पथके वाढविण्यात आली आहेत. स्थायी पथक केंद्रावर पूर्णवेळ हजर राहणार आहे. कोरोना काळात पार पडलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्येच परीक्षा केंद्र देण्यात आली होती. मात्र, त्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडल्याचे आढळून आले. यावेळी कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी कठोर उपाय करण्यात आले आहेत.

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा