Home LOCAL NEWS सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी आज 2 तासांची देखभाल दुरुस्ती

सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी आज 2 तासांची देखभाल दुरुस्ती

0

नागपूर (Nagpur), 8 जून 2026: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे. या नियोजित मान्सूनपूर्व कामांतर्गत, तुळशीबाग वीज वाहिनीवरील पीन इन्सुलेटर बदलणे आणि वीज तारांच्या मार्गातील झाडांच्या फांद्या छाटणे ही तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. या आवश्यक देखभाल दुरुस्तीमुळे मंगळवार, 9 जून रोजी सकाळी 8 ते 10 या दोन तासांच्या कालावधीत तुळशीबाग वाहिनीवरील वीजपुरवठा तात्पुरता खंडित राहणार आहे.

या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नवी शुक्रवारी, डी मार्ट समोरील परिसर, सरईपेठ, सिरसपेठ, अशोक चौक, गुलाबाबा आश्रम परिसर, मांगपुरा, काशीबाई मंदिर, भोसले विहार, रहातेकर वाडी, दसरा रोड, गुजरवाडी आणि नाईक रोड या परिसरांतील वीजपुरवठा दोन तासांसाठी बंद असेल. पावसाळ्यात वीजपुरवठ्यात अडथळा येऊ नये आणि नागरिकांना सुरक्षित वीज सेवा मिळावी, यासाठी हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. या संक्षिप्त कालावधीतील नियोजित देखभालीसाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर