Home Artical Blog अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार सुधाकर अडबाले

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार सुधाकर अडबाले

0

नागपूर (Nagpur): नागपूर-काटोल मार्गावर झालेल्या एका अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी तत्परता दाखवत मानवतेचे दर्शन घडविले. आज दुपारी नागपूर ते काटोल दौऱ्यावर असताना मार्गात झालेला अपघात त्यांच्या निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून जखमी सौ. वनिता कुणाल मोहरिया यांच्या मदतीसाठी धाव घेतली.

रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता आमदार अडबाले यांनी स्वतःच्या वाहनातून जखमी महिलेला काटोल येथील रुग्णालयात दाखल केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश खोब्रागडे यांना तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. प्राथमिक उपचारानंतर रुग्णाच्या पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्याची आवश्यक व्यवस्था देखील करण्यात आली.

या प्रसंगी आमदार अडबाले यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. लोकप्रतिनिधी हा केवळ प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणारा नसून सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा असावा, याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून आला. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा कार्यवाह संजय वारकर आणि नीलेश खोरगडे उपस्थित होते.