‘सोलार इंडस्ट्रिज’वर सायबर हल्ला

0

सीबीआय करणार तपास : लष्करासाठी तयार करते स्फोटके

नागपूर. देशातील नामांकित ‘सोलार इंडस्ट्रिज’वर (Solar Industries ) सायबर हल्ला (cyber attack ) करण्यात आला आहे. सोलार समूहाकडून लष्करासाठी स्फोटके तयार केली जातात. सैन्यासाठी स्फोटके तयार करणाऱ्या संस्थेवर झालेल्या सायबर हल्ल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कंपनीचा संवेदनशीलअसा महत्त्वपूर्ण डेटा सायबर हॅकरने (cyber hacker ) चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून सायबर सेलकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (CBI) सोपविण्यात आला आहे. सोलार समूहाकडून शस्त्र, एक्स्पोसिव्ह यासह विविध क्षेत्रातील उत्पादने तयार करण्याचे काम केले जाते. त्यातूनच कंपनीचे देशाच्या संरक्षण विभागाशी अनेक महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. भारती सैन्यासाठी मल्टिमोड ग्रेनेईड्स तयार केले जातात. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी ही घठना फारच गांभीर्याने घेतली आहे. रामदासपेठ येथे ‘सोलार इंडस्ट्रीज’ कंपनीचे कार्यालय आहे. याशिवाय बाजारगाव परिसरात त्यांचे उत्पादन तयार करण्याचा कारखाना आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी कंपनीच्या रामदासपेठ येथील कार्यालयात सायबर हॅकरद्वारे त्यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, त्यातून ‘२ जीबी’ डाटा चोरल्याची माहिती कंपनीने दिली. त्यांना एक लिंकही पाठविली. ती ओपन करण्यास सांगण्यात आले. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती ओपन न केल्यामुळे हॅकरच्या माध्यमातून ‘प्रोटोन’ मेल पाठविण्यात आला. त्यात ७२ तासांत मेलमध्ये दिलेल्या सर्व सूचना मान्य करण्याचे नमूद करण्यात आले.

दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर सेलकडे २१ जानेवारीला तक्रार नोंदविली. सायबर सेलने त्याबाबत तपास केला असता, हॅकरद्वारे कंपनीचा डेटा चोरण्यात आल्याचेही समोर आले. त्यातून सेलद्वारे आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार कंपनीचा अतिशय संवेदनशील डेटा हॅकर्सच्या हाती लागला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणानतर समूहाचे संकेतस्थळदेखील बंद झाले आहे. साईट अंडर मेंटनन्स असा संदेश दिसत आहे.

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा