कोकणात मविआला धक्का, भाजपने बाजी मारली, शेकापचे बाळाराम पाटील पराभूत

0

मुंबई : विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांच्या निवडणुकीत पहिला निकाल कोकण शिक्षक मतदारसंघातून आला भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली. त्यांनी महाविकास आघाडी समर्थित (Konkan Teachers Constituency Election) शेकापचे बाळाराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. म्हात्रे यांना २० हजारांवर मते मिळाली तर बाळाराम पाटील यांना साडेनऊ हजारांच्या आसपास मते मिळाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. आघाडीने शेकापचे बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला होता. पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत 91 टक्क्यांपर्यंत मतदान केले होते.

दरम्यान, भाजपच्या या विजयावर विजयी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय माझा एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ६ वर्षांतल्या कामाची पोचपावती शिक्षकांनी दिली आहे. ३३ संघटनांचा मला पाठिंबा होता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आज सुफळ झालाय. त्यावरच आज हा विजय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नावर मी आंदोलनं केली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे रात्री-बेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला होता. आता पेन्शनचा प्रश्नही मला सोडवायचा आहे, असेही म्हात्रे म्हणाले.

औरंगाबादेत मविआची आघाडी
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात मविआचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर असून भाजपाचे किरण पाटील पिछाडीवर पडल्याचे दिसून आले आहे.
नाशिकमध्ये तांबे आघाडीवर?
नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्याकडून निकालापूर्वीच विजयाचे दावे होत आहेत. या मतदारसंघातून अद्याप एकही ट्रेंड आलेला नाही

 

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा