दुपारी कार्यक्रमांचं आयोजन नको, सरकारचा निर्णय

0

मुंबईः (mumbai)महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे १४ जणांच्या मृत्यूच्या दुदैवी घटनेनंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही मोकळ्या जागेत 12 ते 5 या वेळेत कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली (Government decision post Kharghar Tragedy) आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने याबाबत (GR)जीआर देखील काढला आहे. जोपर्यंत अधिक तापमान आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. तीन आठवड्यांपूर्वी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेच्या कृती आराखड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, (MAHARASHTRA)महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशी घटना घडेल अशी कुणी एक टक्काही कल्पनाही केली नव्हती. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात जे काही घडले त्याची राज्यात पुनरावृत्ती होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये, म्हणून सरकारने महत्वाचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत उन्हाची दाहकता आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या जागेत कोणताही कार्यक्रम घेऊ नये. जनतेने या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहनही लोढा यांनी केले आहे.
नवी मुंबईतील (KHARGHAR)खारघर येथे रविवारी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नेत्यांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

 

नीर दोसा आणि आटेका दोसा | Neer Dosa Recipe | Atta Dosa Recipe | Ep-113 | Shankhnaad News |