प्रबुद्ध महिलांनी काळे वस्त्र परिधान करुन नोंदविला सरकारचा निषेध

0

– जागतिक महिला दिनाचे औचित्य काय ?

******************************************************************************************************************

नागपूर : अंबाझरी परिसरातील डॉ आंबेडकर भवनासाठी प्रबुद्ध महिलांच्या धरणे आंदोलनाचाआज ४८ वा दिवस होता.शासन, प्रशासन महिलांच्या न्याय मागण्या बाबत साधी दखल घेत नाही. या निषेधार्थ आंदोलनकर्त्या महिलानी काळे वस्त्र परिधान करून सरकारचा निषेध व्यक्त केला.
देशात आजही महिलांच्या प्रश्नाकडे शासन,प्रशासन लक्ष देत नाही. महिला सुरक्षित नाहीत असा आरोप करण्यात आला. डाॅ. बाबासहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन न्याय,हक्क,स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यास प्राधान्य देवुनही महिला पीड़ित आहेत.

बलत्कार,अत्याचाराचे प्रकार वाढतच असतांना देशात महिला दिवस साजरा करण्याचे ऒचित्य काय?असा सवाल आंदोलनात उपस्थित मान्यवरांनी केला.
आंदोलनस्थळी जैबुन्निसा शेख, ओ.बी.सी. महासंघाच्या कार्याध्यक्ष प्राचार्य शरयु तायवाडे नेहा ठोंबरे(यु.ट्यूब चॅनल) यांनी भेट दिली. पल्लवी जिवनतारे, केवल जिवनतारे यांचा नाटक प्रयोग सादर करण्यात आले.

सातत्याने आंदोलनस्थळी उपस्थित ज्येष्ठ महिला शांताबाई वानखेडे, विजया नंदेश्वर,सुमन गायकवाड,जयंता बाई काळबांळे,सुमन वानखेडे, पदमा रंगारी, सिंधु नाईक, अंजनाबाई कांबळे जयवंता मेश्राम यांचा शाल देवुन सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी डाॅ. सरोज आगलावे, पुष्पा बॊध्द, तक्षशिला वाघघरे, डाॅ. सरोज डांगे, सुषमा कळमकर,ज्योति आवळे, उज्वला गणविर, छाया खोब्रागडे, कल्पना मेश्राम,सरिता सातारडे,जयश्री गणविर, भारती सहारे,सुगंधा खांडेकर, नलिनी नाईक,रजनी लिंगायत, पुष्पा घोडके, शैला नंदेश्वर, वंदना आटे,रिता नागरे,सुनिता चव्हाण,द्रोपदी रंगारी, सुनिता चव्हाण पोर्णिमा शेलारे,यमुताई वाळके,शोभा घरडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.