केडीके रोडवर कापड दुकान खाक,चार जणांना बाहेर काढले

0

 

नागपूर: नंदनवन परिसरातील केडीके कॉलेज रोडवर त्यांनी कानीबीस फॅशन स्टुडिओ नामक एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की ही तीन मजली संपूर्ण इमारतच आपल्या कवेत घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत योगेश नरेंद्र पसीने वय 36, श्रुती योगेश पसीने वय 27 वर्ष ,आस्था योगेश पसीने वय 6 वर्ष, आणि कबीर योगेश पसीने वय 4 वर्षे यांना सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला. लकडगंज अग्निशमन स्थानकातील गाडी क्रमांक एम एच 31,/ 4928 गाडी क्रमांक एम एच 31/ 6771 तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन अधिकारी डीपी चव्हाण, शेख,चवरे, कोरचे, येडवे,मेश्राम आदी सहकाऱ्यांनी यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सोबतीला सकरदरा अग्निशमन स्थानकातील गाडी क्रमांक 4925 पोहचली. अग्निशमन अधिकारी शिर्के आणि सहकाऱ्यांनी सहकार्य केले. या आगीत सुमारे पंधरा लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा