NAGPUR नागपूर – महाराष्ट्रात ( BJP ) भाजप-शिवसेनेच्या माध्यमातून (EKNATH SHINE ) एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNVIS ) यांची सत्ता असताना अलिकडे झालेल्या विविध निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळू शकले नसल्याने आता भाजपमध्ये राज्यभरात संघटनात्मक फेरबदलाचे वारे वाहत आहे. या महिनाखेरीस काही जिल्हा प्रमुखांसह हे बदल होतील असे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष (CHNDRSHEKHR BAWANKULE ) चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिले. शिक्षक-पदवीधर नागपूर, अमरावती पाठोपाठ कसबा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही. चिंचवडमध्ये यश मिळाले, परंतु विजयी उमेदवारापेक्षा पराभव झालेल्या पहिल्या दाेन उमेदवारांची मतांची बेरीज ही भाजपपेक्षा माेठी आहे. यामुळे पक्षातंर्गत चिंता व्यक्त केली जात आहे. यावर ताेडगा काढण्यासाठी भाजपमध्ये माेठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत पक्षाकडून दिले गेले आहेत.
कसबा पराभवानंतर भाजप पक्षाच्या चिंतन बैठक झाली. यात पक्षाच्या महाराष्ट्रातील भूमिकेवर चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपची पुनर्रचना हाेणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बानवकुळे यांनी ही पुनर्रचना कसबा पाेटनिवडणुकीच्या पराभवामुळे हे फेटाळून लावले. या पुनर्रचनेत योग्य नेतृत्वाला योग्य संधी दिली जाईल.पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवूनच ही पुनर्रचना असेल असेही बावनकुळे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. दरम्यान, अवकाळी पाऊसग्रस्त ( Pretty ) शेतकऱ्यांना सरकार नक्कीच मदत करेल,.विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी ते त्यांचे कामच असते. उद्या राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस प्रथमच मांडणार असून तो सर्वाना दिलासादायी असेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.