अमरावती जिल्हयामध्ये “गाव फेरी”ला प्रचंड प्रतिसाद

0

अमरावती (Amravti), 6 एप्रिल अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याव्दारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आणखी भर टाकून एक नवीन उपक्रम म्हणून “गाव फेरी” हा उपक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी म्हणजे शनिवारी प्रत्येक गावांमध्ये राबविण्यात आला.या गावफेरीत गावपातळीवरील कर्मचारी,स्वीप सदस्य,पिंक फोर्स सदस्य,बिएलओ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,आरोग्य कर्मचारी,पोलिस पाटिल,ग्रामपंचायत कर्मचारी,शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.बडनेरा मतदार संघातील सर्व गावात हा उपक्रम राबविला गेला अशी माहीती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बडनेरा मतदार संघ यांनी सांगीतले.

यामध्ये गाव पातळीवरील BLO, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पिंक फोर्स मधील सर्व सदस्य त्याचप्रमाणे महाविद्यालयीन / हायस्कुल / प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि प्रामुख्याने गावातील नागरीकांचा सहभाग घेऊन सदर उपक्रम यशस्वी केला. यामध्ये मतदार जनजागृती बाबतचे बॅनर, स्लोगन सह गावामधून फेरी काढण्यात आली आणि नागरीकांना मतदान करण्याकरिता मतदानाचे / लोकशाहीचे महत्व पटवून देवून मतदानाकरिता प्रोत्साहीत करण्यात आले.करिता यामध्ये संबंधीत BLO, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पिंक फोर्स मधील सर्व सदस्य त्याचप्रमाणे महाविद्यालयीन / हायस्कुल / प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि प्रामुख्याने गावातील नागरीकांचा सहभाग यांचा सहभाग घेवून गाव स्तरावर “गाव फेरी” बाबतचे नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांचेकडे सांदर करावा.असे आवाहन स्पीपचे भातकुली नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी दिपक कोकतरे यांनी केले आहे.