२३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण

0

 

(Mumbai)मुंबई : मराठा आरक्षणासाठी २३ जानेवारीपासून मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. (Maratha Reservation Agitation) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. २३ जानेवारीपासून सुरु होणारे हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपण्याच्या सूचना देखील राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २० जानेवारीला जिल्हाधिकार्यालय आणि महानगरपालिका या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहेत.

त्यानंतर वार्ड व तालुका या ठिकाणी हे अधिकारी २० आणि २१ तारखेला प्रशिक्षण देतील. हे सर्वेक्षण २३ जानेवारीला सुरू करून ३१ जानेवारीपर्यंत संपविण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. तसेच, हे सर्वेक्षण करत असताना सॉफ्टवेअर कसे वापरायचे या संदर्भात तीन दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल जाणार आहेत.

सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त हे नोडल ऑफिसर म्हणून काम करणार असल्याचे देखील आदेशात म्हटले आहेत. सदर सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.