संस्कृत साहित्यातील रामायणेवर व्याख्यान

0

 

संस्कृत साहित्यातील रामायणे या विषयावर डॉ चंद्रगुप्त वर्णेकर यांचे व्याख्यान..

अखिल भारतीय साहित्य परिषद आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांचे संयुक्त आयोजन

(Nagpur)नागपूर ता १७ जानेवारी…प्रभू रामचंद्र हे देशातील प्रत्येक भारतीयाचे दैवत आहे. अशा प्रभू रामचंद्राचे त्याच्या जन्मस्थानी म्हणजेच अयोध्येत भव्य मंदिर उभारले गेले असून त्याचे लोकार्पण येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी उत्साहात केले जाणार आहे.

या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने देशात १जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या दरम्यान ठीकठिकाणी धार्मिक वैचारिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागरण केले जाणार असून प्रभू रामचंद्राप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली जात आहे.

अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनेही या निमित्ताने विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांमधून साहित्यातील राम ही संकल्पना ठेवून जनसामान्यांना संदेश दिला जाणार आहे.

या कार्यक्रममालिकेत साहित्य परिषदेने विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला येथे कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. गडचिरोली वर्धा आणि अमरावती येथेही येत्या दोन-तीन दिवसात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

नागपुरात या मालिकेत ७ जानेवारी रोजी ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश एदलाबादकर यांचे तुलसी रामायणातील राम या विषयावर व्याख्यान झाले होते. तर १४ जानेवारी रोजी ख्यातनाम पत्रकार, अभ्यासक आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी लिखित अयोध्येच्या इतिहासाचा आढावा घेणाऱ्या अयोध्या या ग्रंथाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते पार पडले होते.

याच मालिकेत नागपुरातील तिसरा कार्यक्रम अ.भा.साहित्य परिषद, नागपूर जिल्हा आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला असून यावेळी ज्येष्ठ अभ्यासक डॉ चंद्रगुप्त वर्णेकर यांचे संस्कृत साहित्यातील रामायणे या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे.

पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या राम नगर चौकातील श्री राम मंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ संस्कृत विदुषी (Dr. Nanda Puri)डॉ नंदा पुरी या भुषविणार आहेत…

याच कार्यक्रमात पधारो राम..बिराजो राम या रामगीताचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. हे हिंदी गीत ज्येष्ठ कवयित्री (Shraddha Bhardwaj)श्रद्धा भारद्वाज यांनी शब्दबद्ध केले असून ख्यातनाम संगीतज्ञ (Renowned Musician Dr. Prof. Tanuja Nafde)डॉ. प्रा. तनुजा नाफडे यांनी संगीतबद्ध करून गायिले आहे. रामललाच्या प्रतिष्ठापना निमित्ताने हे गीत रचले आणि संगीतबद्ध करण्यात आले आहे. हे गीत युट्युब आणि अन्य समाजमाध्यमांद्वारे जगभरातील रामभक्तांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन (A.B. Sahitya Parishad Vidarbha Province President Lakhan Singh Katre) अ.भा. साहित्य परिषद विदर्भ प्रांत अध्यक्ष लखनसिंह कटरे, (Working President Avinash Pathak General Secretary Sachin Narle)कार्याध्यक्ष अविनाश पाठक महामंत्री सचिन नारळे, ( Nagpur District President Dr. Suruchi Dabir)नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरुची डबीर, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, विश्वस्त मुकुंद सरमुकद्दम, वृषाली शिलेदार, अशोक आग्रे, श्रीराम सावरकर, अशोक केदार, मृणाल पुराणिक ई. प्रभृतींनी केले आहे.