मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आज ठरणार?

0

(Mumbai)मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार असून जागावाटपावर अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागवाटपावरुन रस्सीखेच कायम आहे. त्यामुळे तिन पक्षांमध्ये कोण नमते धोरण घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.(Lok Sabha Election 2024)

(Mamata Banerjee)ममता बॅनर्जी आणि (Arvind Kejriwal)अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत काय घडणार, याकडे लक्ष लागलेले आहे. जागावाटपासंदर्भात अद्याप आघाडीत एकमत झालेले नाही. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. कोणता पक्ष किती आणि कोणती जागा लढवणार? याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा (Prakash Ambedkar)प्रकाश आंबेडकर यांना, तर राजू शेट्टी यांना शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आज याबाबत निर्णय होऊ शकतो.

या बैठकीला शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असतील. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये सकाळी ह बैठक सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीचं राजू शेट्टी यांना आमंत्रण आलेले नाही.

जागावाटपावरुन वाद

महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. त्याशिवाय काँग्रेसलाही जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत बैठकात तोडगा निघालेला नाही. त्यात प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना तीन जागा देण्याबाबत चर्चा सुरु आहे.