नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येताहेत दोन नवीन पाहुणे

0

 

गोंदिया (Gondia) – गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गेल्या वर्षी 20 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील दोन वाघिणींना सोडण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा दोन वाघिणी सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीची वन विभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढच्या महिन्याच्या अखेरीस व्याघ्र प्रकल्पात दोन वाघीण सोडण्यात येणार असल्याचे वन्यजीव विभागाने सांगितले आहे. हे दोन वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून आणले जातील व नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहेत. यामुळे नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन पाहुणे येण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. या

व्याघ्र प्रकल्पात टप्प्याटप्याने पाच वाघ आणण्याची योजना आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यात देखील दोन वाघिणी सोडण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, ती अंतिम टप्यात आहे. पुढच्या महिन्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघीण या प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची एक चमू चंद्रपूर येथे जाऊन आले. या प्रकल्पात वाघ सोडल्यानंतर कुठल्या उपाय योजना कराव्या लागतात याची माहिती घेऊन त्याचा अभ्यास सुद्धा करण्यात आला आहे.

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्पात वाघ सोडल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येणार व येणाऱ्या पर्यटकांना वाघाचे दर्शन होणार त्या मुळे नक्की पर्यटक संख्या वाढतील असा विश्वास पवन झेप, उपसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांनी व्यक्त केला.