पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होणार..?

0

नवी दिल्ली NEW DELHI -पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही कपात करुन नागरिकांना दिलासा देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. Petrol and Diesel पेट्रोल आणि डिझेल किमान १० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामागील कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत घसरण झालेली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एका वर्षात कच्च्या तेलाच्या किमती किमान १२ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तथापि, तेल कंपन्यांनी अद्याप किंमती कमी केलेल्या नाहीत. कंपन्यांकडून शेवटची कपात एप्रिल २०२२ मध्ये झाली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोलचा प्रतिलिटर दर १०० रुपयांच्या वर, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९० रुपयांच्या वर आहे. किमती कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे.

मात्र, आता केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कपात झाल्यास लोकांना त्याचा मोठा लाभ मिळू शकेल व त्याचा अर्थव्यवस्थेला देखील फायदा होईल, असे तज्ज्ञांना वाटते.