चुकीचा पत्ता दिल्यास आरटीई प्रवेश रद्द

0

अमरावती (Amravti), 9 एप्रिल विद्यार्थ्यांना शिक्षण हक्ककायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश घेतला; मात्र, संबंधित विद्यार्थी व त्याचे पालक हे प्रवेश अर्जासोबतच जोडलेल्या घरभाडे करारावरील पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आल्यास पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे.सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठीइच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरातील सरकारी, जिल्हा परिषद अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळांमध्येप्राधान्य क्रमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळा उपलब्ध नसल्यास स्वयं अर्थसहाय्यित शाळा आणि खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे.

असे असावे भाडे करार पत्र

भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांसाठी भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. तसेच भाडेकरार हा आरटीई प्रवेश अर्ज भरण्यापूर्वीचा असावा, त्याचा कालावधी ११ महिने किवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा, ज्या ठिकाणाचा भाडे करारनामा दिलेला असेल तेथे पालक राहतो किवा नाही, यांची तपासणी केली जाणार आहे. पालक राहत नसल्याचे आढळून आल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करणे, पालकांवर कायदेशीर कारवाई करणे आणि सर्व शुल्क भरणे, अशी संयुक्त कारवाई केली जाणार आहे.