नागपूर,अमरावतीमध्ये भाजपला धक्का बसण्याचे संकेत, मविआचे उमेदवार आघाडीवर

0

नागपूरः नागपूर शिक्षक व अमरावती पदवीधर मतदारसंघात सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत असून या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. कोकण मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाजी मारली असली तरी इतर मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल की काय, अशी परिस्थिती आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळे तर नाशिक पदवीधरमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी मोठी आघाडी घेतली असल्याची माहिती आहे. नागपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी भाजपचे नागो गाणार यांच्यावर निर्णायक आघाडी मिळविल्याची माहिती आहे तर दुसरीकडे अमरावतीमध्ये भाजपचे नेते डॉ. रणजीत पाटील पिछाडीवर असून महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे हे पहिल्या फेरीत आघाडी घेऊन होते. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळे पुन्हा निवडून येतील, असे संकेत मतमोजणीतून मिळत आहेत. कोकणात मात्र भाजपला दिलासा मिळाला असून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडी समर्थित शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केलाय.

 

 

 

राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe|