विदर्भाच्या मातीतील ‘घात’ बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार

0

कलावंतांमध्ये उत्सूकता, ९५ टक्के वैदर्भीय कलावंतांचा समावेश

पोंभूर्णा. विदर्भाच्या (Vidharbha) मातीत तेसुद्धा नक्षलवाद्यांचा वावर असलेल्या जंगलात चित्रित झालेला स्लो-बर्न थ्रिलर असलेला ‘घात’ चित्रपट (Ghat movie ) ७३ व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Berlin Film Festival) झळकणार आहे. या चित्रपटात विदर्भातलच ९५ टक्के कलावंतांना संधी दिली गेली आहे. भारताकडून पाठविण्यात आलेल्या ‘घात’ चित्रपटात पोंभुर्ण्याचा कलावंत धनंजय सुधाकर मांडवकर यांची प्रमुख भूमिका असून हा सन्मान धनंजयच्या रूपाने झाडीपट्टीतील पोंभुर्ण्यासारख्या छोट्याश्या गावाला मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. घात हा मुख्यतः गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद पसरलेल्या भागात आदिवासींचे जगणे, आदिवासींची कला कौशल्य व संस्कृतीचे दर्शन घडविणारा चित्रपट आहे. गडचिरोलीतील समस्या, आदिवासींचे प्रश्न, नक्षलवाद पसरलेल्या भागात पोलिसांचे नागरिकांसोबत असणारे संबंध व सदृश्य घटना या चित्रपटात मांडण्यात आला आहे. हा एक थ्रिलरपट असून जंगलातील वास्तव खोलात जाऊन उलगतो.

छत्रपाल निनावे यांच्या पुढाकारातून चित्रपट तयार झाल आहे. फिल्म स्टुडिओ प्लॅटून वन फिल्म्सचा नवीन रोमांचक वैशिष्ट्यासह ‘घात’ चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर झडकण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव असलेला बर्लिन चित्रपट महोत्सव येत्या १६ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.मुलांची प्राथमिक शाळा पोंभूर्णा येथून अशोक बासनवार गुरुजींच्या नेतृत्वाखाली जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रमात धनंजयने चौथा वर्गात असताना रंगमंचावर पाऊल टाकले आणि त्याच्यातील अभिनय कलेचे रोपटे मोठे होवू लागले. पुढे चंद्रपूर, नागपूर असा प्रवास करीत धनंजयने मास्टर ऑफ फाईन आर्ट्समध्ये नाट्यशास्त्र विभागात मास्टर डिग्री केली आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (दिल्ली) येथून विशेष कार्यशाळेत प्रशिक्षण घेतले. द्वंद्व, राकोश, कंबल, या चित्रपटात लहान भूमिकांपासून त्याने सुरुवात केली. दस्तखत, ब्यान्नव, बॅक डोअर या लघुपटात अभिनय केला आहे. २०१६ मध्ये ‘धनंजय’ने चित्रपटाच्या प्रेमापोटी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथील नोकरी सोडली आणि चित्रपट क्षेत्रातील नव्या वाटेवर पाऊल ठेवले. खरंतर त्याचा हा संघर्ष २००२ पासूनच सुरु होता. अनेक अडथळे पार करत आज २०२३ मध्ये त्याच्या या संघर्षाला यश मिळाले आहे. पोंभुर्ण्यासारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी व शिक्षक कुटुंबात वाढलेला धनंजय आज बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘घात’च्या माध्यमातून वर्ल्ड प्रीमियर झळकणार आहे.

 

 

 

 

राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe|