अकोट परिसरातू परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला

0

6 ठार, 7 जखमी : पिकअप व्हॅनला ट्रकची धडक

अमरावती. मेळघाटच्या धारणीला (Dharani of Melghat ) लागून असलेल्या अकोट परिसरातून काम करून गावी परतणाऱ्या मजुरांचा वाहनाला मध्यप्रदेशातील देडतलाई शेखपुरा (Dedtalai Sheikhpura in Madhya Pradesh) येथे बुधवारी अपघात झाला होता. उस घेऊन जाणाऱ्या ट्रकने मजूर असलेल्या पिकअप व्हॅनला धडक दिली होती. या भीषण अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू (Five people died on the spot in the accident ) झाला होता तर आठ जण जखमी झाले होते. त्यातील एक चार वर्षीय चिमुकला मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टरांच्या शर्थीच्या पर्यत्नांनंतरही त्याला वाचविचा येऊ शकले नीही. गुरुवारी त्या चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खकणार पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्रातील पिकअप व्हॅनसह दोन्ही वाहनांचे चालक घटनास्थळावरून फरार झाले. दारासिंग श्रीराम (४ वर्ष) सुंदरबन असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जणांवर मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूरसह इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर खंडवा बैतूल जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर रोजगारासाठी अमरावती, अकोला, बुलढाणा परिसरात शेतीकाम, कापणीसह इतर कामांसाठी येतात. दोन महिन्यांपूर्वीसुद्धा करजगाव येथून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची खासगी बस सोबत धडक झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील सर्व मृतक मध्यप्रदेशातील होते. टायर फुटला अन् ओढवले संकट
अकोट परिसरातून निघालेल्या एमएच ४८ -टी ४५०९ क्रमांकाची चार चाकी पिकअप मजुरांना घेऊन जात असताना उसाच्या ट्रकल ओव्हरटेक करताना वळणावर टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक खकणार पोलिसांकडून देण्यात आली.

ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा
भीषण अपघातानंतर ट्रक आणि पिकअप वाहनाचा चालक दोघेही फरार झाले. घटनेच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा ते घटनास्थळी किंवा पोलिस ठाण्यात पोहोचले नाहीत. खकनार पोलिसांनी एमपी ०९- केडी १७२३ क्रमांकाच्या ट्रकचालकाविरुद्ध २८९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सिंग यांनी दिली. अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळणावर चार चाकी चा टायर फुटल्याने हा अपघात झाला त्या वाहनाच्या मालकासह चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe|

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा