कॅमेरा नव्हे कथा सांगण्याची कला महत्त्वाची

0

आदित्य शर्मा यांचे प्रतिपादन : ‘कॉलेज के दिन’ थिमवर लघुपट स्पर्धा

नागपूर. चित्रपटाची निर्मिती करताना तुमचा कॅमेरा किती महाग आहे, यापेक्षाही कथा सांगण्याची कला अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चित्रपट आणि माहितीपट निर्माते आदित्य शर्मा (Film and Documentary Producer Aditya Sharma ) यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातर्फे (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University Public Relations Department ) राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या सहकार्याने नुकतेच ‘सिनेस्टोरी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठस्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘कॉलेज के दिन’ थिमवर ही लघुपट स्पर्धा पार पडली. दूरदर्शनच्या ३४ वर्षांच्या अनुभवानंतर निवृत्त झालेले अनुभवी चित्रपट आणि माहितीपट निर्माते राजीव गायकवाड हे पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष होते. ते स्पर्धेच्या ज्युरीचे अध्यक्षही होते.

जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईझ मन्नान हक यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश विषद केला. राजीव गायकवाड, श्रुती इंगोले, नीरज नखाते, तेजिंदर सिंग मानकू आणि अभिजीत साहू यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. चालन लिट्टी टॉमसन, निशांत जिभे आणि रुपाली मोहरकर यांनी केले. रुपल अनासाने (दोडके) यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना उपयुक्त टिप्स
विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठांतर्गत महाविद्यालये, संस्था आणि अध्यापन विभागांसाठी स्पर्धा खुली होती. ‘दृष्टिभ्रम’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक केलेले आणि अनेक पुरस्कार विजेते चित्रपट बनवणारे आदित्य शर्मा यांनी दृकश्राव्य निर्मितीच्या क्रिएटिव्ह तसेच तांत्रिक बाबींमधील त्यांचे अनुभव आणि ज्ञान कथन केले. त्यांनी स्क्रिप्ट रायटिंग, चित्रीकरण आणि व्हिडीओचे एडिटिंग याबाबत मौल्यवान टिप्स उपस्थितांना दिल्या.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची बाजी
प्रो-कॅमेरा गटात प्रथम पारितोषिक डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या संघाने पटकावले, तर मोबाईल फोन प्रकारात प्रथम पारितोषिक जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळाले. दोन श्रेणीतील द्वितीय पारितोषिक अनुक्रमे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या संघांनी पटकावले. डॉ. आंबेडकर ज्यु. कॉलेज आणि जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स संयुक्त तृतीय पारितोषिकाचे विजेते ठरले.

 

 

संत्र्याची खीर आणि स्वीट कॉर्न साटोळी EP No-85|Orange kheer recipe|Sweet Corn Recipe|shankhnaad news