
मुंबई MUMBAI -अयोध्येत होणाऱ्या सोहळ्यात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठेवरुन ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राणप्रतिष्ठा देशाच्या राष्ट्रपत्तींच्या हस्ते करण्यात यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नाशिकमधील काळाराम मंदिरात ठाकरे गटाकडून केल्या जाणाऱ्या पूजेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. Uddhav Thackeray on PM Narendra Modi अयोध्या येथे २२ तारखेला राम मंदिर सोहळा असून याच दिवशी उद्धव ठाकरे हे नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन आरती करणार आहेत.
आयोध्येत राम मंदिरांचे उद्घाटन होत आहे. पण राममंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही माहिती नाही, अशी टीका देखील ठाकरे यांनी मोदी यांच्यावर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतु कार्यक्रमात शुक्रवारी घरंदाजीवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ‘जे घरंदाज आहेत, त्यांनीच घरणेशाहीवर बोलावे. गद्दारांची घराणेशाही चालते का? म्हणजे, गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय आहे, असा पलटवार त्यांनी केला. मुंबईत अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. या पूलाला अटल बिहारी बाजपेयी यांचे नाव दिले. मात्र, कार्यक्रमात कुठेही त्यांचा फोटो नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.