पुण्यासलीला शरयू रक्ताने लाल झाली!

0
पुण्यासलीला शरयू रक्ताने झाली!
पुण्यासलीला शरयू रक्ताने झाली!

सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आपल्या जन्मभूमीवर उभारल्या जात असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होत आहेत. संपूर्ण देशभर आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ही विशेष लेखमाला.

| भाग 3 | 

30 ऑक्टोबर 1990 बाबरीवर भगवा फडकवून हिंदू शक्तीचा विजय झाला. अयोध्या मे परिंदा भी पर नही मार सकता अशी दर्पोक्ती असलेल्या आणि संपूर्ण उत्तर प्रदेशात दहशत उभी केलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंहांचा अहंकार चूर झाला. मुलायमसिंह सुडाने पेटले. गठ्ठा मतांसाठी परकीय आक्रमक बाबराने लावलेला कलंक जतन करण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांडातील जनरल डायरची पुनरावृत्ती मुलायमसिंहांच्या रूपाने प्रगटली.

सर्व कारसेवक अयोध्येतच थांबले होते. ठिकठिकाणी अडवून ठेवलेले, मार्गात अडवलेले कारसेवक अयोध्येत पोहचतच होते. कारसेवा हे प्रतिकात्मक आंदोलन होते. पुन्हा २ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता कारसेवा करायची ठरले. कारसेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे. सुमारे ५० हजार कारसेवक भजने गात निघाले. पुन्हा एकदा अयोध्येचा परिसर जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमला. कारसेवकांचा मोर्चा दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडविला. अश्रूधुराची नळकांडी फोडली गेली. प्रचंड लाठीमार सुरू झाला. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे महानायक अशोकजी सिंहल यांच्यावर पोलिसांनी प्राणघातक हल्ला चढवला. रक्तबंबाळ अशोकजी जमिनीवर कोसळले. मुलायमसिंह जातीने नजर ठेवून होते. कितीही रक्त वाहिले तरी चालेल पण कारसेवकांना श्रीरामजन्मभूमी पर्यंत पोहचू द्यायचे नाही, असे पोलीसांना आदेश होते. 30 ऑक्टोबर 1990 च्या कारसेवकांचा बदला घ्यायचा, असे ठरले होते. जो सापडेल त्याला पोलीस लाठ्यांनी तुडवत होते. कारसेवकांची पांगापांग झाली. एवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला, ‘एकही गोळी वाया घालवू नका. नेम धरून उडवा !’ आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या.
घुमटावर भगवा फडकावणाऱ्या शरदकुमार कोठारीला एका बोळीतून चक्क खेचूनच बाहेर काढण्यात आले. तो काही बोलण्याच्या आत त्याच्या मस्तकात गोळी घातली गेली. त्याला वाचविण्यासाठी त्याचा भाऊ रामकुमार कोठारी आडवा आला, तर त्यालाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले! विशीतील दोघे कोठारी बंधू ‘जय श्रीराम’ म्हणत हुतात्मा झाले.
30 ऑक्टोबरच्या कारसेवेत जे आघाडीवर होते, त्यांना शोधून टिपण्याची योजना होती. अंधाधुंद गोळीबार सुरू होता. त्यासाठी मुलायमसिंहानी स्वतःच्या मर्जीतील काही विशेष पथके तयार केली होती.
गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले. भारताच्या लोकशाहीला काळिमा फासणारा तो दिवस होता. भारतीय राज्यघटनेला पायदळी तुडवले गेले होते. मणिराम छावणीत प्रेतांचा खच होता. अयोध्येला छावणीचे रूप होते. शेकडो तरुण जखमी होते. सर्वत्र आक्रोश होता. हातात शस्त्र न घेता रामललाच्या दर्शनाला निघालेल्या रामभक्तांना यमसदनी पाठवण्याचे पातक मुलायमसिंहानी केले  होते. पुण्यासलीला शरयू रामभक्तांच्या रक्ताने लाल झाली होती. देश सुन्न झाला होता. मात्र, विविध राज्यात आणि केंद्रात सत्तेत बसलेले कथित धर्मनिरपेक्ष सत्ताधारी निषेधाचे एकही अक्षर तोंडातून काढायला तयार नव्हते. उलट रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा कार्यक्रम राबवला गेला. स्वतःला बुद्धिजीवी म्हणवणारी, पुरोगामी म्हणवणारी, समाजवादी आणि डावे एकत्र येऊन रामविरोधी आलाप करीत होते. या कंपूसाठी बाबराचे अस्तित्व हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनला होता.
एवढी मोठी किंमत चुकवल्यानंतरही रामभक्तांच्या उत्साहावर विरझण पडले नाही. उलट रामभक्तांचा निर्धार अधिक पक्का झाला. सौगंध राम की खाते है, हम मंदिर वही बनायेंगे, हा संकल्प करत रामभक्त आपापल्या गावी परतले.
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
9881717827
#rammandir #hindu #ram #bjp #ayodhya #hinduism #india #narendramodi #jaishreeram #rss #hindutva #modi #jaishriram #hindustan #sanatandharma #kattarhindu #yogiadityanath #bajrangdal #bharat #bhagwa #mahadev #hindurashtra #hanuman #yogi #vhp #kattar #harharmahadev #namo #shiva #ayodhyarammandir