राज्यात रुग्णवाहिका महाघोटाळा, कोणी केला आरोप?

0

मुंबई MUMBAI  : महायुतीच्या सरकारवर MAYUVATI महाघोटाळ्याचे आरोप झाले आहेत. राज्यात अॅम्बुलन्सचा महाघोटाळा झाला असून त्यात ४ हजार कोटींचे टेंडर तब्बल ८ हजार कोटींना काढण्यात आल्याचा आरोप झाला आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप करताना घोटाळ्यात एका बड्या मंत्र्याचा हात असल्याचा आरोपही केल्याने खळबळ माजली आहे.

महायुती सरकारचा ८ हजार कोटीचा आणखी एक महाघोटाळा पुढे आला असल्याचा आरोप करुन वडेट्टीवार यांनी सांगितले की, केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर टेंडर काढून रुग्णवाहिका (Ambulance) खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. ४ हजार कोटीमध्ये जे काम होवू शकत होते, त्या कामासाठी ८ हजार कोटीचा खर्च करण्यामागील कारण काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. यासंदर्भात माहिती देताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत २ जुलै रोजी निविदा काढण्याचा काढण्याचा निर्णय झाला. ४ ऑगस्ट २०२३ रोजी निविदा काढण्याचा अध्यादेश निघाला.

पहिले टेंडर सप्टेंबर २०२३ ला निघाले आणि त्याची मुदत २१ दिवस होती. पुढे ते टेंडर रद्द करण्यात आले. पहिल्याच टेंडरवर दुसरे टेंडर ४ जानेवारी २०२४ ला निघाले आणि त्याची मुदत ७ दिवस होती. यासंदर्भात प्री-बिड बैठकही घेण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला. मर्जीतील माणसांना कोट्यावधीची काम देण्यासाठी, वाटेल ती शक्कल लढवली जात आहे. केवळ सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर १०८ रुग्णवाहिकांचे ८ हजार कोटीचे टेंडर काढण्यात आले. रुग्णवाहिकेचे कोणतेही टेंडर ३ वर्षांपेक्षा जास्त नसते, मात्र हे १० वर्षांसाठी काढण्यात आला आहे. ते केवळ ४ हजार कोटींचे असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केलाय. यातून जनतेच्या पैशांची लूट होत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.