‘मिशन-48’ शिवसेनेचे प्रचाराचे रणशिंग !

0

 

बुलढाणा BULDHANA – आगामी लोकसभा निवडणुकीत ‘मिशन-48’ ‘Mission-48’  साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली होती. राज्यातील  SHINDE GROUP शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघात ही यात्रा येत आहे. आता लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे.

‘मिशन-48’ शिवसंकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेत आहे. हा मेळावा चिखली येथील तालुका क्रीडा मैदानावर होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलडाणा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्ताने शिवसेना लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.