मिलिंद देवरा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

0

मुंबई MUMBAI – काँग्रेसचे असंतुष्ट नेते मिलिंद देवरा Milind Deora  मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या देवरांनी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा, असा असा इशाराच शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिल्यावर या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांना पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण दिले असल्याने देवरा मोठा राजकीय निर्णय घेणार काय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत करताहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महाआघाडीत ठाकरे गटाकडे जाणार अशी स्पष्ट चिन्हे दिसत असतानाच देवरांनी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी जाहीर मागणी करुन महाआघाडीत खळबळ माजवून दिली. देवरा हे सातत्याने काँग्रेसवरही नाराजी व्यक्त करीत असतात. त्यामुळे ते काँग्रेस सोडून पर्याय निवडतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

ते कदाचित शिंदे गटात सहभागी होतील, असे अंदाज व्यक्त होत आहेत. आज शिंदे गटाने त्यांना पक्षात येण्याच जाहीर निमंत्रण दिले आहे.

मिलिंद देवरांसारख्या नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंना साथ मिळाल्यास मुंबईत शिवसेना भक्कम होईल, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. मिलिंद देवरांची इच्छा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. मात्र, आता या राजकीय घडामोडींवर भाजप व शिंदे गटात चढाओढ सुरु होईल की काय, असेही संकेत मिळत आहेत.