या जिल्ह्यात बसचा पुन्हा भीषण अपघात

0

(Jalna)जालना – पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसला मंठा ते जालना रोडवर अपघात झाला आहे. मंठा जवळील केंधळी येथील ब्रिजखाली ही बस गेली. या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम सुरु आहे. याच ठिकाणी आयशरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस पुलाखालील खड्ड्यात गेली. या बसमध्ये 42 प्रवासी होते. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सुदैवानं या अपघातात कोणतीही जीविहानी हानी झाली नसल्याची माहिती आहे. बस अपघातातील रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.