Home Top News खा. सुप्रिया सुळे तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यांवर

खा. सुप्रिया सुळे तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यांवर

0

नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे या नागपूर,वर्धा,अमरावती या जिल्हाचा दौरा करणार असून या दरम्यान त्या विविध ठिकाणी भेट देणार व काही मान्यवरांच्या भेटी घेणार आहेत. सोबतच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. दि १ ते ३ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा हा विदर्भ दौरा राहणार असून त्यांच्यासोबत पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे प्रदेश पदाधिकारी सुध्दा उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
रविवारी त्याचे नागपूर येथे आगमन होणार असून दुपारी १२.३० वाजता दिक्षाभुमीला भेट देणार आहेत. यानंतर स्वागत लॉन, सिव्हील लाईन येथे दुपारी २ वाजता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. रविवारी त्यांना नागपूर येथेच मुक्काम असून २ ऑक्टोबर सोमवारला त्या सकाळी वर्धा जिल्हाच्या दौऱ्यावर निघणार आहे. ९ वाजता पवनार आश्रमाला भेट देणार,सकाळी १० वाजता सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देवून गांधी जयंती निमित्त तल महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहेत दिवसभर बैठकानंतर अमरावती येथे मुक्कामी जाणार आहेत. ३ ऑक्टोबर मंगळवारला खा. सुप्रिया सुळे सकाळी ८.३० वाजता अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेवून सकाळी ११ वाजता कॅम्प रोडवील नविन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचे उध्दाटन करणार आहेत. दुपारी १२ वाजता राजापेठ येथील शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उदघाटन करतील. दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. नंतर नागपूर येथे येवून पुण्याकडे रवाना होणार आहेत. खा. सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्यामुळे विदर्भातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना एक नविन उर्जा मिळणार असल्याचे मत सुध्दा सलील देशमुख यांनी व्यक्त केले.