मुंबई-सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींच्या प्रमाणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याचे बोलले जात असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचा इन्कार केला. आमच्यात वाद किंवा संघर्ष झालेला नसून केवळ चर्चा झाली. मी माझा मुद्दा काहीसा मोठ्याने मांडला, एवढेच झाल्याचे भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, काल मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेताना आरक्षणाचा अनुशेष बाकी आहे, याकडे मी लक्ष वेधले होते. माझ्यात व अजित पवारांत कोणतेही मतभेद नाहीत. मी माझा मुद्दा काहीसा मोठ्या आवाजात मांडला एवढेच. तो मुद्दा तिथेच संपला आहे. एका घरात दोन भावांची चर्चा होती, तशी आमच्यात चर्चा झाली, असेही भुजबळ म्हणाले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















