खारगर मृत्यूसंख्या १२ वर,विरोधकांनी सरकारला धरले धारेवर

0

खारघरः नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे (Maharashtra Bhushan Award Tragedy )झालेल्या मृत्यूची संख्या १२ वर पोहोचली आहे. सोमवारी उपचारादरम्यान आणखी एका श्रीसेवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उष्माघातामुळे सुमारे 50 श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता या मृत्यूंच्या घटनांवर राजकारण सुरु झाल आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोयीमुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम भरदुपारी ठेवण्यात आला की काय? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. नागपुरातील महाविकास आघाडीची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी नवी मुंबईतील (MGM HOSPITAL)एमजीएम रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर (UDDHAV THACKERAY )उद्धव ठाकरे आणि(AJIT PAWAR) अजित पवार यांनी कार्यक्रमाच्या नियोजनावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

 

कार्यक्रमाच्या नियोजनावरून आता विरोधकांनी सरकारवर तोप डागली आहे. केंद्रीय गृहमंत्री(AMIT SHAHA) अमित शहांना दुपारी जायचे असल्याने कार्यक्रमाची भरदुपारी वेळ ठेवली असेल तर हे दुर्दैवी आहे. एका चांगल्या कार्यक्रमाला यामुळे गालबोट लागले आहे, अशी टीका त्यांनी केली. तर कार्यक्रमाची वेळ भरदुपारी निवडणे, ही आयोजकांची चूक होती, अशी टीका अजित पवारांनी केली.

 

 

चिकन भुना मसाला आणि हॉट हनी चिकन टॅकोस|Chicken Bhuna Masala Recipe|Honey Chicken Tacos Recipe|Ep-112