वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

0

 

गोंदिया (Gondia)- दुचाकी धारकांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनांनी सीटबेल्टचा वापर करावा याबाबत पोलिसांकडून अनेकवेळा जनजागृती करण्यात आली. पण तरीही गोंदिया जिल्ह्यातील नागरिक हेल्मेट आणि सीटबेल्टच्या बाबतीत आणि वाहतुकीच्या इतर आवश्यक नियमांकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

यालाच आळा बसवण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी हेल्मेट नसलेले धारक, सीटबेल्टचा वापर न करणे, फॅन्सी नंबर प्लेट विविध, प्रकारचे मोडिफाई सायलेंसर अशा वाहनधारकांवर जानेवारी ते मार्चच्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 35 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पोलिसांचा फक्त कारवाई करणे हा हेतू नसून, जनसामान्यांमध्ये जनजागृती होऊन त्यांनी हेल्मेटचा आणि सीटबेल्टचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी केले आहे.