खारघर घटनेवरून राज ठाकरेही सरकारवर बरसले

0

मुंबईः(MUMBAI) खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात़ उष्माघाताच्या बळींची संख्या १२ वर पोहोचली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील राज्य सरकारवर बरसले आहेत. “हा सोहळा सायंकाळी का घेण्यात आला नाही? सरकारला काहीच कळत नाही का?,” अशा तिखट शब्दांत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका (Raj Thackeray on Kharghar Incidence) केली. राज ठाकरे यांनी कामोठीतील (MGM HOSPITAL)एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या श्रीसेवकांची भेट घेतली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी का नाही घेतला, प्रशासनाला इतकेही कळत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला

 

.
राज ठाकरे म्हणाले की, “ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी(Appasaheb Dharmadhikari) ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचे अभिनंदन केले होते. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागले, ते टाळता आले असते. कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत आहेत. इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळले नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “राज्य सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही, याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे” असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

 

 

चिकन भुना मसाला आणि हॉट हनी चिकन टॅकोस|Chicken Bhuna Masala Recipe|Honey Chicken Tacos Recipe|Ep-112