नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे आशीनगर झोनमधील ८ थकबाकीदारांवर सोमवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये आठही थकबाकीदारांकडील साहित्य जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांच्या आदेशान्वये आशीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राउत यांच्या नेतृत्वातील पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
श्रीमती कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु, (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, ), देवेन्द्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, भूषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी, परीतमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. १२९, १२९ / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, श्रीमती प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर अशी या मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे आहेत.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा