
जीवनानंद वारकरी बाल सुसंस्कार शिबीर; नवं पिढीला नवा आदर्श मार्ग
कोंढाळी(Kondhali) – स्थानिक श्री संत गजानन महाराज ध्यान मंदिर विकास नगर, तरोडा रोड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्त गुरुवार दि 30 एप्रिलला रात्री ला ह.भ.प. पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्र संतांचे ग्रामगिता विचारधारा यावर हरी कीर्तन आयोजित केले आहे. सोबत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती निमित्त त्यांचे भारत भूमितील योगदान जीवनकार्यावर प्रकाश टाकणार आहे.
संस्थानाचे वतीने यावर्षी सुद्धा जीवनानंद वारकरी बाल सुसंस्कार शिबीराचे भरीव आयोजन केले आहे. 15 दिवस चालणारे वारकरी शिबिरात गायन वादन, हरिपाठ, आदर्श दिनचर्या, उत्तम सवयी, आदी महत्वाचे विषयाला हात घालून व्यक्तीमत्व घडण्यास याचा निश्चित लाभ होणार असल्याचे शिबीर संयोजक व संस्थानाचे अध्यक्ष जीवन जवंजाळ यांनी माहिती दिली. नव्याने दोन वर्षांपूर्वी कोंढाळी येथे संत गजानन महाराज भव्य मंदीराची वास्तू त्यांनी उभारली असून त्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहे. गजानन महाराज प्रगट भव्य दिन उत्सव सप्ताह, नवरात्र मध्ये वारकरी गरबा नाविण्यापुर्ण यशस्वी ठरला आहे.नुकताच शिव जयंती उत्सव, हनुमान जयंती उत्सव येथे शेकडो तरुण महिला, वृद्धाचे उपस्थितीत पार पडला आहे. विशेष उपक्रमात 500 नगरवासियांना शेगाव येथे दिंडीसह मोफत प्रवास सर्व व्यवस्था संस्थानाचे वतीने यशस्वी व अविस्मरणीय ठरली आहे.

राष्ट्रसंतांचे विचारांची शिकवण व पाईक
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनाजनात पोहचविण्यास येथे राष्ट्र प्रार्थना, भजन राष्ट्रवंदना आदी उपक्रम राबविले जात आहे. दर गुरुवारला येथे आरती व प्रार्थना नंतर महाप्रसाद दिल्या जातो. सूप्रसिद्धी तून भक्तांची उपस्थिती वाढत आहे.
राष्ट्रीय कार्याचे सर्वत्र कौतुक
संस्थानाची अतिशय आकर्षक वास्तू, बगीचा, भव्य शिवाजी पुतळा, नयनरम्य परिसर भक्तांनाचे आकर्षण ठरत आहे.
व्यक्तिमत्व बाल संस्कार शिबिरात अनुभवी प्रशिक्षक,ह.भ.प. मकरंद महाराज चोधरी (गायक)ह.भ.प. समाधान महाराज पवार (काकडा हरिपाठ,ह.भ.प. नितीत महाराज पवार अकोला,जवंजाळ वारकरी अभंग भजन शिक्षीका सौ. कल्याणी पंकज पोहोकार
ज्योतिष्य पंचांग प्राथमिक माहीती मार्गदर्शक अंजलीताई राजेशजी गाडगे नागपूर, विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी मनिषाताई जीवनजी जवंजाळ, वारकरी यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे. संस्कार शिबीर उदघाटन सोमवार दि. ४ मे तर समारोप 14 मे राहणार आहे. शिबीर व कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवहान जीवन आधार बहुउदेशीय संस्थानाचे संस्थापक तथा अध्यक्ष जीवन जवंजाळ यांनी केले आहे.
















