Home Artical Blog नागपूर शहरातील मंतरलेले ‘ते’ चार दिवस

नागपूर शहरातील मंतरलेले ‘ते’ चार दिवस

0

नागपूर(Nagpur):
विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, देखणे सोहळे, संतांची मांदियाळी, सर्वदूर हिंदुत्वाचा गजर, भक्तांची अनावर गर्दी, मान्यवरांचे उद्बोधन, प्रभू नावाचा गजर…. आणि आपसूकच निर्माण झालेले भगवामय वातावरण…
गेल्या आठवड्यात तब्बल चार दिवस नागपूर शहरात असे चित्र बघायला मिळाले. ऐन एप्रिल महिन्यातही तळपत असलेल्या सूर्याच्या साक्षीने तर कधी इथल्या गर्मीला दाद न देता ओसंडून पाहिलेल्या भक्तांच्या उत्साहाचीही प्रचिती या निमित्ताने आली. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष
स्वामी गोविंददेव गिरी महाराज, बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्ण शास्त्री, साध्वी ऋतंभरा यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे देखील या काळात सर्वच कार्यक्रमात उपस्थित होते. एकूणच भारावलेले, प्रेरणादायी असे वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झाले होते. एकूण, हे सारेच कार्यक्रम भक्तांसाठी पर्वणी ठरले… चार दिवसांच्या या मेजवानीने एकूणच शहराचा रंग बदलला, वातावरण बदलले…

कार्यक्रम १
भारत-दुर्गा शक्तिस्थळाचा शिलान्यास सोहळा.
उभारण्यात आलेल्या अतिभव्य अशा मंचावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्वामी अवधेशानंद गिरी: आचार्य महामंडलेश्वर.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज: कोषाध्यक्ष, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, धिरेंद्र कृष्ण शास्त्री: बागेश्वर धाम, साध्वी ऋतंभरा
आशिष जयस्वाल, प्रसाद लाड, सुनील मनोहर इत्यादींची उपस्थिती.
भारत-दुर्गा शक्तिस्थळ डॉ. आबाजी थत्ते सेवा व संशोधन संस्थेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात उभारले जात आहे. भारताला आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या पुन्हा एकदा सामर्थ्यवान बनवणे, हे यामागील मुख्य प्रयोजन आहे. पाश्चात्य विचारांचा प्रभाव दूर करणे: दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारतीयांच्या मनावर जो पाश्चात्य विचारांचा ‘लेप’ चढला आहे, तो उतरवून प्रत्येकाला अंतर्बाह्य ‘भारतमय’ करणे.

राष्ट्रजागृती: दैनंदिन कृतीपासून ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत सर्वांनी भारतीयत्वाचा स्वीकार करावा आणि राष्ट्रजागृतीची भावना जागी व्हावी.

शक्ती आणि भक्तीचा संगम: भारताला जगात श्रेष्ठ स्थान मिळवून देण्यासाठी केवळ सत्याची नव्हे, तर शक्तीचीही गरज आहे, हे अधोरेखित करण्यासाठी १८ भुजा असलेल्या ‘भारत-दुर्गा’ मातेची मूर्ती स्थापन करणे.

५२ वे शक्तिपीठ: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या स्थळाला भारताचे ‘५२ वे शक्तिपीठ’ म्हणून संबोधले आहे, जे भविष्यात देशाला प्रेरणा देईल.

जग आज संघर्षाच्या स्थितीत असताना भारत आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मार्गाद्वारे जगाला दिशा दाखवू शकतो.

राम मंदिराचे काम पूर्ण झाले तरी जोपर्यंत रामराज्य (सुशासन) येत नाही, तोपर्यंत कार्य पूर्ण होणार नाही. हे शक्तिस्थळ ‘अखंड भारताच्या’ निर्मितीसाठी आणि भारताला शक्तिसंपन्न बनवण्यासाठी ऊर्जा केंद्र ठरेल.

कार्यक्रम २
प्रिय यशवंतराव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वैचारिक आधारस्तंभ आणि ज्येष्ठ प्रचारक प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हाही सोहळा असाच देखणा, नीटनेटका ठरला.

अभाविप विदर्भ प्रांतातर्फे ‘अभिवादन कार्यक्रम’ आणि ‘स्थायी कार्यकर्ता एकत्रीकरण’ या उपक्रमाद्वारे त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, हा मुख्य उद्देश होता.

​स्व. यशवंतरावांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत राहून समाजासाठी आणि विद्यार्थी संघटनेसाठी समर्पित केले होते.

आणीबाणीच्या काळात आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ज्या कौशल्याने संघटना उभी केली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा होता.

यशवंतराव हे कार्यकर्त्यांसाठी एक ‘वस्तुपाठ’आणि खऱ्या अर्थाने ‘रोल मॉडेल’ होते, असं मत डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केलं.

प्रतिकूल परिस्थितीला अनुकूलतेत बदलण्याचे कसब त्यांच्याकडे होते. कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यात आणि त्यांना संघटनेच्या कामाची शिस्त लावण्यात ते निष्णात होते.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची प्रेरणा ही ‘देशभक्ती’ असायला हवी, असे प्रतिपादन डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
सध्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण आहे, पण या सुख-सुविधांमध्ये न अडकता कामाचा वेग वाढवावा, असा सल्ला यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमात ‘प्रिय यशवंतराव’ नावाचे एक विशेष ‘पयरूप संवाद’ सादर करण्यात आले, ज्यातून त्यांच्या जीवनातील विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडले गेले. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांचीही प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रम ४
नाग भूषण अवॉर्ड फाउंडेशन’ तर्फे ‘नाग भूषण’ पुरस्कार
या चार दिवसातला हा तिसरा देखणा व अविस्मरणीय सोहळा. डॉ. मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. समाजात उत्स्फूर्त व नि:स्वार्थ सेवा प्रदान करणाऱ्यांच्या कामाची दखल घेणारा हा कार्यक्रम. हा सोहळा केवळ पुरस्कारांचा नसून तो नागपूरच्या कर्तृत्वाचा, सामर्थ्याचा आणि देशसेवेचा उत्सव होता. ‘शक्तीचा वापर कल्याणासाठीच व्हावा’ हा मुख्य संदेश यातून देण्यात आला.

सत्यनारायण नुवाल :
ते ‘सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’चे अध्यक्ष आहेत. संरक्षण क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या कंपनीने तयार केलेली शस्त्रे आणि अस्त्रे आज भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. ‘ऑपरेशन सिंधू’ मध्येही त्यांच्या कंपनीचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.

दक्ष खंते:
दक्ष खंते हे जगातील सर्वात युवा ‘आयर्नमॅन’ म्हणून ओळखले जातात. अत्यंत कमी वयात त्यांनी क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरचे नाव उंचावले आहे.

नागपूर आणि विदर्भाची प्रतिष्ठा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करणे हा या पुरस्काराचा प्राथमिक हेतू होता. ज्या व्यक्तींनी स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कार्य केले आहे, त्यांना सन्मानित करून तरुणांसमोर आदर्श ठेवणे.

सरसंघचालकांनी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीकडे असलेली शक्ती ही स्वतःच्या यशासाठी नसून ‘सर्वांच्या कल्याणासाठी’ वापरली जावी, हा विचार या पुरस्कारामागे आहे. संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी नुवाल यांच्यासारख्या उद्योजकांचे आणि तंदुरुस्त भारतासाठी दक्ष खंते सारख्या खेळाडूंचे महत्त्व अधोरेखित करणे.
कृतज्ञता व्यक्त करणे: उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे, आपल्या स्वतःच्या लोकांकडून मिळणाऱ्या पुरस्काराचे मोल वेगळे असते; हीच कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे हा या सोहळ्याचा उद्देश होता.

कार्यक्रम ४
राम मंदिर निर्माण कार्यात योगदान देणाऱ्यांचा सत्कार
याच कालावधीत आणखी एक सुंदर, नेटका कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम होता, अयोध्येतील राम मंदिर निर्माण कार्यात योगदान देणाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा.
अयोध्येत निर्माण झालेले प्रभू श्रीरामांचे मंदिर म्हणजे लक्षावधी भारतीय नागरिकांचे प्रेरणास्थान. या मंदिराच्या निर्माणासाठी गेली अनेक वर्ष झालेला संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर आता पूर्ण झालेले मंदिराचे बांधकाम…. या पार्श्वभूमीवर या मंदिराच्या निर्माणासाठी योगदान देणाऱ्या, निर्माण कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महनीयांचा सत्कार पार पडला. देशभरातील सुमारे तीस व्यक्तींच्या सत्काराच्या या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मंदिर निर्माण ट्रस्ट चे गोविंदगिरी महाराज, चंपत राय, भैय्याजी जोशी, श्रीधर गाडगे प्रभृती यावेळी उपस्थित होते.
नृपेंद्र मिश्र, जगदीश आफळे, गिरीश सहस्त्रभोजनी, जगन्नाथ गुळवे, आशिष सोमपुरा, निखिल सोमपुरा, अरुण योगीराज, जय काकतीकर, मनीष त्रिपाठी, सत्यनारायण पांडे, अनिल सुतार, केशव शर्मा, विनोद शुक्ला, राजीव दुबे, मनीष दधीच, विनोद मेहता, अंकुर जैन, राजकुमार सिंह, ए व्ही एस सूर्या श्रीनिवास, नरेश मालवीय, परेश सोमपुरा, नाथ अय्यर, संजय तिवारी, शरद बाबू, अनिल मिश्र, गोपाल जी, चंपत राय, गोविंद गिरी महाराज, वासुदेव कामत, रमजान भाई यांचा या ३० मान्यवरांमध्ये समावेश होता.
याशिवाय जितेंद्रनाथ महाराज भागीरथ महाराज सुनील देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, विहींपचे अध्यक्ष अलोक कुमार, का. मायाताई इवनाते, सत्यनारायण नुवाल, बनवारी लाल पुरोहित, राजेंद्र पुरोहित, सुनील रायसोनी व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते