केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडून बेईमानी केली होती-फडणवीस

0

मुंबईः २०१४ मध्ये शिवसेनेने फक्त चार जागांसाठी युती तोडून आमच्याशी बेईमानी केली होती. त्यामुळे वर्षानुवर्षे ११७ जागा लढणारा भाजप एका दिवसात सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढण्यास सज्ज झाला होता. अमित शहा यांच्या रणनीतीच्या जोरावर आम्ही ती निवडणूक जिंकली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्यावर (DCM Devendra Fadnavis) आधारित एका पुस्तकाचा प्रकाशन (Shiv Sena Broke Alliance only for 4 Seats) सोहळ्यात केले. फडणवीस म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आपण शिवसेनेसह युती करण्यास तयार होतो. आपण कमी जागा लढण्यासही तयार होतो. पण केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली. अचानक युती तुटल्यानंतर आम्ही सर्वच्या सर्व जागा लढविण्याची तयारी केली. त्याचे एकमेव कारण म्हणजे अमित शाह आपल्या पाठीशी उभे होते, असे फडणवीस म्हणाले.


फडणवीस म्हणाले की, अमित शाह दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहिले. याच कार्यालयात ते मुक्काम करायचे, दिवस घालवायचे. निवडणुकीत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली. शिवाय निवडणुकीतील अनेक गोष्टी, तंत्र त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्यातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात भाजपाचे स्वत:चे सरकार आपण पाहिले. यामध्ये अमित शाह यांचा सिंहाचा वाटा आहे. जम्मू-काश्मीरमदून कलम 370 हटवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. “खून का नदिया बहेंगी” अशा वल्गना त्यावेळी केल्या गेल्या. आता तेथे खून की नदियां नाही तर विकासाची गंगा वाहत आहे. नक्षलवाद, पीएफआय, दहशतवादाविरोधात ते ज्याप्रकारे ते कारवाई करत आहेत, त्यात त्यांची दृढता दिसत आहे. अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांना मानणारे आहेत. छत्रपतींचा इतिहास त्यांना तारखांनुसार माहिती आहे. त्यांनी त्यावर पुस्तकही लिहिले आहे. लवकरच त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

*नागपुरी गोळाभात रेसिपी | Nagpur Special Gola Bhat Recipe | Episode 33 | Shankhnaad News*