गायक लकी अलीची भूमाफीयांविरुद्ध तक्रार

0

मुंबई: आपल्या शेतजमिनीवर एका भूमाफियाने त्याच्या आयएएस पत्नीच्या मदतीने हक्क सांगितल्याची तक्रार सुप्रसिद्ध गायक लकी अली याने केली आहे.(Singer Lucky Ali Singer alleges land mafia encroaching) कर्नाटकच्या बंगळुरु येथे लकी अलीची शेतजमीन आहे. ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याविषयी लकी अलीनं फेसबूकवर एक पोस्ट शेयर केली असून ती जमिन माझी आहे आणि एका भुमाफियाने त्याच्या सनदी अधिकारी पत्नीच्या मदतीने ती जमिन बळकावत असल्याचा आरोप त्याने केला आहे. लकी अलीने यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मागील ५० वर्षांपासून माझी त्या जागी शेतजमिन असून आता काही नवीन लोक जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने म्हटले आहे. अलीने फेसबुकवर सांगितले की, काही लोक जबरदस्तीने त्यांच्या शेतात घुसले. कर्नाटकच्या डीजीपींना त्यांनी पत्र लिहिले आहे की माझे नाव मकसूद महमूद अली असून मी दिवंगत अभिनेते आणि कॉमेडियन मेहमूद अली यांचा मुलगा आहे आणि लकी अली या नावाने मी ओळखला जातो. मी सध्या कामासाठी दुबईत आहे त्यामुळे तुमच्या मदतीची गरज आहे. बेंगळुरूचे भूमाफिया सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डी यांनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावली आहे. रोहिणी सिंधुरी या आयएएस अधिकारीच्या मदतीने त्यांनी हे कृत्य केले असून रोहिणी या स्वतःच्या फायद्यासाठी राज्यातील सुविधांचा गैरवापर करत आहेत. ते लोक जबरदस्तीने माझ्या शेतात घुसले असून आवश्यक कागदपत्रं दाखवण्यास नकार देत आहेत, असेही त्याने नमूद केले आहे. लकी अलींची ही पोस्ट समोर आल्यानंतर त्यांच्या सर्व चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

https://youtu.be/JHnxHoM2LLo
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा