सोलापुरः सोलापूर जिल्ह्यात अकलुज येथे दोन जुळ्या बहिणीशी विवाह करणाऱ्या तरुणाबद्धल पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे हे मुळात वादग्रस्त असलेले लग्न आणखी वेगळ्याच वादात सापडले (Twin sisters married same Person in Akluj) आहे. पोलिसांनी यासंदर्भात अतुल अवताडे या तरुणाची चौकशी केल्यावर त्याचा खरा चेहरा पुढे आला आहे. त्याचे आधीच एक लग्न झाले असल्याची माहिती पुढे आली आहे. अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली असल्याने आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होणार की कसे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
दोन बहिणींनी एकाच तरुणाशी विवाह केल्याच्या अकलूज येथील घटनेची (Akluj Marriage case) राज्यभर चर्चा सुरु असताना या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणे नवरदेव अतुल अवताडे याला महागात पडण्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासात अतुलचा यापूर्वी एक विवाह झाला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे आता हे लग्न कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. राज्य महिला आयोगाने (State Women Rights Commission) या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा असून सोलापूर पोलिस अधिक्षकांनी यासंदर्भात चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला सादर करावा, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. अकलूज येथे हा अजब विवाह सोहळा 2 डिसेंबरला पार पडला होता. या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केलं आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यांना लहाणपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याप्रकरणात आता नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानेही या लग्नाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेसंबधी चौकशीचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दिले आहेत. यासंदर्भात माहिती देताना आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, “सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा.” असा आदेश चाकणकर यांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिले आहेत.
दोन जुळ्या बहिणींशी विवाह करणाऱ्या तरुणाबाबत धक्कादायक माहिती उघड
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा