नवी दिल्लीः राज्यातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. ठाकरे गटकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासंबधीच्या याचिकेवर 29 नोव्हेंबरलाच न्यायालयात (Hearing on Maharashtra Political crisis in Supreme Court ) सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी लांबणीवर पडली. आता या सुनावणीतील एक न्यायमूर्ती सुटीवर असल्याने ही सुनावणी 10 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात सुभाष देसाई यांनी दाखल याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. मात्र, न्या कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आता पुन्हा केव्हा सुनावणी होणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना आपली बाजू लेखी स्वरुपात मांडण्यास सांगितले होते. यासाठी दोन्ही पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयाकडुन तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, यासंदर्भात आज सुनावणी अपेक्षित होती. ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या प्रकरणात तारीख पे तारीखचे सत्र सुरु आहे. आता 10 जानेवारीपासून या प्रकरणाचा मुख्य युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिवाळी सुटीच्या पूर्वी 12 ते 16 डिसेंबर या कालावधीत कुठलेही प्रकरण ऐकले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच जाहीर केले आहे.
सत्ता संघर्षावरील सुनावणी लांबणीवर, जानेवारीत होणार
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा