दक्षिण भारतातील15 बडे नेते भाजपात

0

चेन्नई, 07 फेब्रुवारी  : लोकसभा निवडणुकी Lok Sabha Elections पूर्वी भारतीय जनता पक्ष दक्षिणेत मजबूत होताना दिसत आहे. तामिळनाडूमधील 15 हून अधिक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये अनेक माजी आमदार, माजी खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भाजप दक्षिण भारतात विस्ताराचा प्रयत्न करीत असताना हे नेते पक्षात दाखल झाले आहेत.

तामिळनाडूतील 15 माजी आमदार आणि एक माजी खासदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या नेत्यांनी नवी दिल्लीत पक्षाचे सदस्यत्व घेतले. यातील बहुतेक नेते ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघमचे (एआयडीएमके) आहेत. यापूर्वी राज्यात भाजप अण्णाद्रमुकसोबत निवडणूक लढवत असे. विशेष म्हणजे भाजप दक्षिणेत विस्तारासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये पोहोचले होते, तिथे त्यांनी रॅली घेतली. आकडेवारी दर्शवते की 2014 लोकसभेच्या तुलनेत केरळमधील काही जागांवर भाजपची स्थिती 2019 मध्ये मजबूत झाली होती. मात्र, या राज्यात पक्षाला लोकसभेची एकही जागा अद्याप जिंकता आलेली नाही.

यापूर्वी कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. मात्र, 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर डिसेंबर 2023 मध्ये जाहीर झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकालही भाजपसाठी निराशाजनक ठरले. पक्षाच्या जागांची संख्या 2018 मधील 1 वरून 2023 मध्ये 8 वर पोहोचली आहे. येथे, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष किंवा टीडीपी पुन्हा एनडीएमध्ये परत येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. एन. चंद्राबाबू नायडू दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.