विविध समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रपुरात निघाला महामोर्चा

0

 

चंद्रपूर  CHNDRAPUR : विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी), अनुसूचित जाती- जमातीच्या आरक्षण बचाव आणि विविध मागण्यांसाठी आज ७ फेब्रुवारी २०२४ रोजी चंद्रपुरात महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा निघाला.

मोर्चाला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर, ओबीसी नेते राजेश बेले, शिवानी वडेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. मोर्चात हजारो ओबीसी समाजातील कार्यकर्ते, अनुसूचित जाती-जमाती, विजेएनटी, एसबीसी बांधव सहभागी झाले होते.
चंद्रपूर येथे ओबीसी, एस्सी, एसटी आरक्षण वाचविण्यासाठी काढण्यात आलेल्या महामोर्चात सहभागीना मार्गदर्शन करण्यात आले.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि ओबीसी नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यात मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.