आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती

0

नागपूर. – (nagpur)ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari ) यांना आज १६ एप्रिल रोजी राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah ) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. (kharghar)खारघर येथे आयोजित या भव्य सोहळ्याला सोहळ्याला मुख्यमंत्री(eknath shinde) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (devendra fadnavis)देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह राज्यभरातील आमदार, खासदार, उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या व्हीआयपींना कार्यक्रमस्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी खारघर येथे आठ हेलिपैड उभारण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी सुमारे २० लाख श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री सदस्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासन, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पनवेल न महापालिकेसह नवी मुंबई पोलिस आठवडाभरापासून मेहनत घेत आहेत.

कार्यक्रमाची जय्यत तयारी गेले काही दिवस सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री(udaya samant) उदय सामंत, बांधकाममंत्री(ranindra chauvan) रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी जातीने लक्ष ठेवून असून, वेळोवेळी आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दोन वेळा कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तयारीची पाहणी केली. कार्यक्रमस्थळी येणाऱ्यांच्या सोईसाठी वेस्ट, एनएमएमटी, टीएमटी आणि केडीएमटीच्या ११०० हून अधिक बसची सोय केली आहे, याशिवाय पार्किंग झोनची सोय केली आहे. १८ लाख ३६ हजारांवर आसनव्यवस्था तयार ठेवली आहे. रविवारी सकाळपासून कार्यक्रमस्थळी श्री सदस्यांचा ओघ सुरू झाला आहे. यामुळे कार्यक्रमस्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर वानांची मोठी गर्दी झाली आहे.

चोख व्यवस्था
या सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ (Ambulance)रुग्णवाहिका, ३५० (Dr)डॉक्टर्स, १०० (nurses)नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता शिंदेंसह व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
सकाळी साडे दहाच्या सुमारास या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री (sudhir mungantiwar)सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

 

चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111