Appasaheb Dharmadhikari आप्पासाहेब धर्माधिकारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबई. ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज अलोट जनसमुदायाच्या साक्षीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari was awarded the Maharashtra Bhushan Award today) आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah ) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी उपस्थित होते. नवी मुंबईच्या खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर (Central Park Grounds in Kharghar, Navi Mumbai) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचे कार्य त्यांच्याकडून गेली अनेक वर्षे सुरू आहे. याशिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मोठा वाटा आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे, यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे.
भव्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्पासाहेबाच्या कार्याला उजाळा दिली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन आम्ही धन्य झाल्याचे फडणवीस म्हणाले. धर्माधिकारी नावाचा इतिहास आपल्या वाचनात आला. एक गोष्ट वाचण्यात आली की, मुळात आपल्या घराण्याचा इतिहास साडेचारशे वर्षांचा आहे. आपल्या आठ पिढ्यांपूर्वी गोविंद चिंतामण शांडिल्य हे महाराजांच्या काळात धर्मजागृतीचे काम करत होते. त्या कामाचे स्वरूप पाहिल्यानंतर महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी सांगितले की आपण केवळ शांडिल्य नाहीत तर आपण धर्माधिकारी आहात. तेव्हापासून महाराजांच्या प्रेरणेनं हे धर्माधिकारी नामाबिरूद लागले. तिथपासून पिढ्यान् पिढ्या हे धर्मजागरणाचे कार्य आपल्या माध्यमातून होते आहे. जगात खरे श्रीमंत तुम्ही आहात. तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. इथे जमलेले लोक हे जगातील आठवं आश्चर्य असल्याचे फडणवीस म्हणाले.

नानासाहेबांनाही महाराष्ट्र भूषण

२००८ मध्ये राज्य सरकारकडून ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१० मध्ये नोंदही करण्यात आली होती.