आज सुपर पॉलिटिकल संडे केजरीवालांची चौकशी, युपीत वेगवान घडामोडी, नागपुरात वज्रमुठ सभा

0

नागपूर.- (nagpur) सुटीचा दिवस असल्याने आज सर्वसामान्यांसाठी आरामाचा दिवस आहे. पण, राजकीय क्षेत्रासाठी आजचा दिवस वेगवान घडामोडींचा ठरणारा आहे (super political Sunday). महाराष्ट्रातील खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Padmashri Dr. Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यानिमित्ताने देशभरातील नेतेमंडळी दाखल होत आहेत. नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा (Vajramutha meeting of Mahavikas Aghadi in Nagpur ) होते आहे. प्रयागराजमध्ये पोलिसांच्या गराड्यातच गँगस्टर अतीक अहम आणि त्याचा भाऊ अशरफची हत्या करण्यात आली. यामुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली असून राजकीय घडामोडी सुरू आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजाऊन चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांची आज चौकशी होणार आहे. त्यावर देशभरातूनच प्रतिक्रिया उमटत आहेत.

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना(maharashtra) महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी २० लाख श्री श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमितशहा, मुख्यमंत्री(eknath shinde) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री(devendra fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रीमंडळातील सदस्या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स्थळाजवळ ८ हेलिपॅड उभारले गेले आहेत. यावरून व्हीआयपी मुव्हमेंटची कल्पना येऊ शकते. कार्यक्रम पुरस्कार वितरणाचा असला तरी त्याला राजकीय किनार नक्कीच आहे.
(mahavikash aghadi)महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा नागपुरात होते आहे. यानिमित्ताने अख्ख्या राज्याचेच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील विरोधी पक्षांतील मोठे नेते या सभेसाठी येत आहेत.

प्रयागराजमध्ये(prayagraj) अतीक आणि अशरफची पोलिसांच्या गराड्यात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी रात्री ही घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन हायलेवल मिटिंग सुरू आहेत. राज्यकर्ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित चौकशीसाठी सीबीआयने पाचारण केले आहे. आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेची तयारी करण्यात आल्याचा आरोप यापूर्वीच आम आदमी पक्षाने केला आहे. देशाच्या विरोधी पक्षांमधूनही तशीच प्रतिक्रिया उमटते आहे.

 

 

चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111