गडचिरोली.- भामरागड तालुक्यातील मर्दहूर (Mardahur in Bhamragarh taluk ) येथील साईनाथ नरोटे याची नक्षलवाद्यांनी (Naxalists) हत्त्या केली होती. तो गडचिरोली येथे राहुन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. होळीचा सण साजरा करण्यासाठी तो गावी परतला होता. त्याचवेळी शेतात गाठून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली होती. तो पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी बाहेर आली होती. आता नक्षलवाद्यांनीही तसाच दावा केला आहे. साईनाथ गडचिरोलीत राहून पोलिसांना माहिती पुरवीत असल्यानेच त्याची हत्या केली, असे नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल विभागाचा प्रवक्ता श्रीनिवास याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पोलिसांनी मात्र नक्षल्यांचे आरोप फेटाळून (police rejected Naxalites’ allegations ) लावले आहेत. साईनाथ नरोटे हा खबऱ्या नव्हे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उच्चशिक्षित युवक असल्याचा दावा केला आहे.
नक्षलवाद्यांनी १० मार्च रोजी साईनाथची हत्या केली होती. या घटनेपासून स्थानिक ग्रामस्थांमध्ये रोष उफाळून आला आहे. परिस्थिती हाताळण्यासह भावनिक गळ घालण्याचा प्रयत्न म्हणून नक्षलवाद्यांनी पत्रकबाजी सुरू केली आहे. श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. त्यात साईनाथ हा मागील काही वर्षापासून उच्चशिक्षणाच्या नावाखाली (Bhamragarh)भामरागड व गडचिरोलीत राहत होता. मात्र, प्रत्यक्षात तो पोलिसांना मदत करीत होता. पोलिसांच्या मदतीनेच तो पोलिस भरतीत सहभागी झाला, म्हणून त्याची हत्या केली, असे श्रीनिवासने म्हटले आहे.
देविसासला नाहक अटक
या हत्येप्रकरणात (police)पोलिसांनी मर्दहूर येथील देविदास गावडे नामक युवकास अटक केली आहे. देविदास हा काही वर्षांपूर्वी नक्षल दलममध्ये कार्यरत होता. त्यानंतर त्याने दलम सोडले. पुढे अनेक वर्षे कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर तो गावात राहून शेती व ग्रामसभेचे काम करीत होता. पोलिसांनी त्याला नाहक अटक केली. शिवाय गावातील आणखी १० नागरिकांनाही अटक केली, असेही श्रीनिवासने पत्रात म्हटले आहे.
पोलिसांचे चोख प्रत्युत्तर
नक्षल्यांच्या पत्राला पोलिसांनीही पत्राद्वारेच चोख प्रत्युत्तर दिले आहे. साईनाथ हा एक गरीब व होतकरू विद्यार्थी होता. तो मागील ३ वर्षांपासून गडचिरोलीत राहून(lipik) लिपीक, (talathi)तलाठी, पोलीस व अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. (police bharti)पोलिस भरतीत २५ हजार युवक, युवतींनी सहभाग घेतला, ते सर्व जण पोलीस खबरीच होते काय? देविदास उर्फ प्रकाश ऊर्फ आडवे मुरा गावडे नक्षलवाद्यांना सहकार्य करीत होता. साईनाथच्या हत्येत त्याचा सहभाग होता. याप्रकरणी केवळ त्यालाच अटक करण्यात आली असून, गावातील कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.