ऑगस्ट महिन्यात रुसलेला वरुण राजा पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र सकाळपासून मुंबईत ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकला का अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति-मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मुंबईत सध्या आकाश उघडे असलं तरी; सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार येत्या 24 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही, असं हवामान विभागाने सांगितलं आहे.
Related posts:
भाजपचे ‘दुकान’ बंद करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी काँग्रेसचे शटर सांभाळावे
June 9, 2026MAHARASHTRA
‘सुमन सुगंध’ संगीत कार्यक्रम 11 जून को स्वर्गीय सुमन कल्याणपुर को दी जाएगी स्वरांजलि
June 9, 2026Artical Blog
जयताळा लास्ट बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल मार्गावरील रस्ता रुंदीकरणाला गती
June 9, 2026Artical Blog


















