Home Artical Blog मान्सूनपूर्व देखभालीसाठी विविध भागांत आज वीज बंद

मान्सूनपूर्व देखभालीसाठी विविध भागांत आज वीज बंद

0

नागपूर(Nagpur), दि. 21 एप्रिल 2026: मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांकरिता महावितरणतर्फे शहरातील विविध वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा बुधवार, २२ एप्रिल रोजी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेस नगर, सिव्हील लाईन्स, महाल, गांधीबाग आणि बुटीबोरी विभागातील भागांचा समावेश आहे.

काँग्रेस नगर विभागातील साई नगर १ व २, गिरीबालाजी नगर, सावरबांधे लेआउट, आम्रपाली नगर, पवार नगर, सलईगोदनी, नवेगाव, निंबा, आणि धामणा भागात सकाळी ८:३० ते १२ वाजेपर्यंत वीज नसेल. व्यंकटेश सिटी, गौरी मिडास, आयटीआय कॉलनी, निवास सोसायटी, रमेश इस्टेट, ओशियन सुपर सिटी, पिरॅमिड ४, माऊली ७, ग्लोरिअस प्लाझा, आरंभ लेआउट, सोहम आणि ओझेन भागात सकाळी ८ ते ११:३० या वेळेत वीज खंडित राहील. दीनदयाल नगर, स्वावलंबी नगर, सरस्वती लेआऊट, जीवनछाया सोसायटी परिसरात सकाळी ८ ते ११, तर अमेया वाहिनीवर सकाळी ८:३० ते १२ वाजेपर्यंत पुरवठा बंद राहील. आरपीटीएस रोड, लक्ष्मीनगर, शिवाजी पार्क आणि धरमपेठ एक्सटेंशनमध्ये सकाळी ७:३० ते ११, तर टिळकनगर, गोकुळपेठ, वाल्मिकीनगर व कॅनॉल रोड भागात सकाळी ८ ते १२ या वेळेत वीज नसेल.

प्रसाद नगर, आनंद नगर, टाकळी सिम, यशोधन नगर, रेणुका माता मंदिर, हिंगणा टी पॉईंट, प्रतापनगर पोलीस स्टेशन, त्रिमुर्तीनगर, भामटी, उज्ज्वल नगर, पावनभूमी, सोमलवाडा चौक आणि वंदना अपार्टमेंटसह लगतच्या परिसरात सकाळी ८ ते ११ या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. सिव्हील लाईन्स विभागातील आकार नगर, स्वामी कॉलनी, जगदीश नगर, प्रेरणा नगर, गंगा नगर, वीर चक्र कॉलनी, एम.बी. स्टेट आणि रक्षा कॉलनी भागात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम चालेल.

महाल विभागातील महाल चौक, पुस्तक बाजार, कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, संघ बिल्डिंग परिसर आणि केळीबाग रोडवर सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत वीज नसेल. गांधीबाग विभागातील शिव नगर, घटाटे नगर, पुनापूर भागात सकाळी ८ ते १०, तर भंडारा रोडवरील श्याम नगर आणि नवीन नगर भागात सकाळी १० ते १२ या वेळेत वीज बंद राहील.

बुटीबोरी विभागातील भिवसेन खोरी, उत्कर्ष, वुडलँड सोसायटी, कृषक महिला भागात सकाळी ७ ते १०, तर हिंगणा-२ वाहिनीवरील औद्योगिक क्षेत्रातील डी-सेक्शन व संदीप मेटल परिसरात सकाळी ७:३० ते १२ वाजेपर्यंत वीज खंडित राहील. याव्यतिरिक्त, अपरेल पार्क उपकेंद्रातील कामामुळे ए, सी, डी, टी आणि आयसी झोनसह फूड पार्क परिसरातील औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी ९ वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर