
रस्त्यांवर धावताहेत सुसाट : अपघाताचे कारण, प्रदूषणातही टाकताहेत भर
नागपूर. अपघातासाठी नागपूर (Nagpur) शहर दिवसेंदिवस कुख्यात होत आहे. यासाठी शासकिय कार्यालयातील 15 वर्ष जुनी झालेली चारचाकी वाहने रस्त्यांवर खुलेआम धावत आहेत. या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडते (Pollution is increasing ) आहे. शिवाय रस्त्यांवरून पायी चालणाऱ्यांसोबत वाहन चालक व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवीतालाही धोका आहे. आजही अनेक शासकिय कार्यालयात कालबाहय झालेली वाहने धावत आहेत. मनपा (NMC), शहर पोलिस (City Police) विभागात अशा जुन्या वाहनांची संख्या अधिक आहे. सुत्रानूसार, वनविभाग, भारतीय विमान प्राधिकरण, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय,महसूल विभागात जुन्या वाहनांचा वापर होत असल्याची यादी आहे. यासह नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये आरटीओत नोंदणीकृत 175 आणि 6 वाहनांची यादी पाठविण्यात आली. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आरटीओंना 4 दिवसाच्या आत म्हणजे 9 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निदेंश दिले आहेत.
स्क्रॅपमध्ये काढण्याचे निर्देश
केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 15 वषें जुनी वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचे निर्देश दिले आहेत. हे धोरण राज्यातही लागू आहे. परंतु, राज्य सरकारने या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत उदासिनता दाखविली आहे. केंद्रीय मंत्रालयाचे अपर सचिवांनी या धोरणास महाराष्ट्रात लागू करण्याबाबत दाखविण्यात येत असलेल्या उदासिनतेबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. त्यानंतहरी राज्य सरकारने परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 15 वर्ष जुने शासकिय वाहने तात्काळ शोधण्याचे निदेंश दिले आहेत.
अहवाल पाठविणार
शासकिय कार्यालयात 15 वर्ष जुनी किती वाहने आहेत, हे शोधण्याचे निदेंश आरटीओंनी दिले आहेत. सद्य:स्थितीत भंगारात किती दिवस लागतील, किती वाहने भंगारात काढली, याचा अहवाल पाठविण्याचे निदेंश दिले आहेत. या आदेशानंतर आरटीओ विभाग खळबळून जागा झाला आहे. त्यामुळेच गुरूवारपासूनच आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक व सहायक वाहन निरीक्षकांना विविध सरकारी कार्यालयात 15 वर्ष जुन्या वाहनांचे शोधकाम सुरू केले आहेत.
हे विभाग आघाडीवर
-महापालिका
-शहर पोलिस विभाग
-वनविभाग
-भारतीय विमान प्राधिकरण
-आरोग्य विभाग
-राज्य परिवहन महामंडळ
-जिल्हाधिकारी कार्यालय
-महसूल विभाग
कुठे किती वाहनांची नोंद
-नागपूर शहर(आरटीओ)-175
-नागपूर ग्रामीण(आरटीओ)-6