Home Artical Blog मातृ सेवा संघ महाल हॉस्पिटलमध्ये १२ मे जागतिक परिचारिका दिन कांचन गडकरी...

मातृ सेवा संघ महाल हॉस्पिटलमध्ये १२ मे जागतिक परिचारिका दिन कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत साजरा

0

मातृ सेवा संघ महाल हॉस्पीटल मधे १२ मे जागतिक परिचारिका दिन मा. कांचन गडकरी मॅडम यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमालाच्या अध्यक्षा माननीय गडकरी मॅडम, सचिव सौ. रश्मीताई फडणवीस, कार्यकारिणी सदस्या अनघा मॅडम, जयश्री मॅडम, डॉ. चौरसीया मॅडम, डॉ. गंधे मॅडम, समक्ष हा कार्यक्रम पार पडला. तसेच सर्व डॉक्टर्स, सेवा निवृत्त सिस्टर आणि इतर कार्यरत स्टाफ उपस्थित होते.

क्लेरा मॅडम आणि वैष्णवी मॅडम यांचा मार्गदर्शनाने सर्व स्टाफ सिस्टर आणि स्टुडंन्ट नी अतिशय सुंदर प्रकारे नृत्य आणि नाटक सादर केले. कार्यक्रमाचे संचालन स्टाफ सिस्टर सौ. ममता नासरे यांनी केले. सहसंचालन रेखा बिनेकर सिस्टरांनी केले.

तसेच आनंदाची बातमी अशी की आमच्या कडील प्रिन्सीपल क्लेरा पटला यांना उत्कृष्ट सिस्टर ट्युटर म्हणून पुरस्कृत करण्यात आले. तसेच सिस्टर श्वेता चौधरी यांना उत्कृष्ठ परिचारिका पुरस्कार देण्यात आला. ही एक अभिमानाची बाब आहे. हे पुरस्कार चारीटेबल असोसिएशन मार्फत मातृ सेवा संघ सीताबर्डी येथे देण्यात आले. अशा प्रकारे मानवाच्या आयुष्यातील जन्माच्या आणि मृत्यूच्या मधली साक्षीदार ही नर्सच असते, आणि त्यामुळे अतिशय आनंदात कार्यक्रम पार पडला व सर्व सिस्टरांना प्रेरित करण्यात आहे.