Home LOCAL NEWS एलआयटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे या परीक्षेत यश 

एलआयटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे या परीक्षेत यश 

0

एलआयटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे या परीक्षेत यश

नागपूर,  : विद्यापीठाने प्रतिष्ठित ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) २०२५ मध्ये यशस्वीरीत्या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली त्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी राष्ट्रीय स्तरावरील पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना गौरविले.

गेट २०२५ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सैकब शेख, तेजस जेरोम, उज्वल कामडी, वैभव ढाकरे, अभिषेक गुंड, जयंत मोवळे, त्रिशा घोष, भूमी चवंडके, कार्तिक मेश्राम, ओम झाडे, हरीश मुदलियार, सुमेध अत्तर महांकाळ आणि हुसेन यांचा समावेश आहे.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला एलआयटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नीरज खटी,एलआयटी विद्यापीठ व एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख सल्लागार मोहन पांडे, एलआयटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे उत्कर्ष खोपकर, स्कूल ऑफ केमिकल इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. भरत भानवसे, डॉ. सौरभ जोगळेकर उपस्थित होते.