नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (एनएफएससी), नागपूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम ), नागपूर यांनी अग्निसुरक्षा शिक्षण, नेतृत्व आणि व्यवस्थापन वाढवण्यासाठी सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
एनएफएससीचे संचालक श्री एन. बी. शिंगणे आणि आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शुक्रवारी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि आयपीएस डायरेक्टर जनरल -एफएस, सीडी व एचजी श्री विवेक श्रीवास्तव, यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य कराराच्या तपशीलावर प्रकाश टाकताना श्री एन.बी. शिंगणे यांनी सांगितले की, ही भागीदारी कार्यकारी शिक्षण, संयुक्त संशोधन उपक्रम, क्षमता वाढवणे आणि वेबिनार आणि परिषदा यांसारख्या ज्ञानाची देवाणघेवाण करणा-या कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
अग्निसुरक्षा व्यवस्थापनातील आधुनिक आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी अग्निसुरक्षा व्यावसायिकांना धोरणात्मक आणि नाविन्यपूर्ण कौशल्ये सुसज्ज करणे, हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.
हा उपक्रम भारतातील अग्निसुरक्षा आणि व्यवस्थापन पद्धतींमध्ये उत्कृष्टता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.